संगणक विकत घेताय - मग खालील गोष्टी नक्की लक्षात घ्या...
* संगणक विकत घेताय* आपण शिक्षण क्षेत्रात काम करत असताना संगणक हा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. शालेय प्रशासनातील जवळ जवळ सर्व माहिती Online झालेली आहे शिष्यवृत्ती Form, सरल डाटाबेस , MDM, Onlinebanking, रिझरवेशन्स , सोशल नेटवर्किंग अशा विविध कामाकरीता संगणक आवश्यक आहे.मग * संगणक विकत घेताना कोणत्या गोष्टी पाहाव्यात किंवा कोणती काळजी घ्यावी ?* 1) * गरज* - आपण संगणक कोणत्या कामासाठी घेणार आहोत ते निश्चित करावे.त्यावरुन आपणास आपले बजेट ठरवता येईल . * Home use* * गेम खेळण्यासाठी* * मनोरंजन* इत्यादी . 2) * रँम* Home वापरासाठी व शालेय कामासाठी लागणा-या संगणकाचा विचार करत आहोत.आपणासाठी 4 जी बी रँम असलेला संगणक पुरेसा आहे. 3) हार्ड डिस्कः- आपण आपला डाटा ज्या वर साठवत असतो ती क्षमता लक्षात घेऊन डार्ड डिस्क किती असावी हे आपण ठरवावे. 500 जी.बी. साठवण क्षमता असलेला संगणक आपल्यासाठी पुरेसा ठरतो. जर साठवण क्षमता 1 टी.बी.करावयाची असेल तर किंमत वाढेल. 4) प्रोसेसरः- प्रोसेसर म्हणजे साध्या भाषेत सागांचे झाले तर संग