संगणक विकत घेताय - मग खालील गोष्टी नक्की लक्षात घ्या...

*संगणक विकत घेताय* 
              आपण शिक्षण क्षेत्रात काम करत असताना संगणक हा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. शालेय प्रशासनातील जवळ जवळ सर्व माहिती Online झालेली आहे शिष्यवृत्ती Form, सरल डाटाबेस, MDM, Onlinebanking, रिझरवेशन्स, सोशल नेटवर्किंग अशा विविध कामाकरीता संगणक आवश्यक आहे.मग

        *संगणक विकत घेताना कोणत्या गोष्टी पाहाव्यात किंवा कोणती काळजी घ्यावी?* 



1) *गरज*  - आपण संगणक कोणत्या कामासाठी घेणार आहोत ते निश्चित करावे.त्यावरुन आपणास आपले बजेट ठरवता येईल . *Home use* *गेम खेळण्यासाठी*  *मनोरंजन* इत्यादी .



2) *रँम*  Home  वापरासाठी व शालेय कामासाठी लागणा-या संगणकाचा विचार करत आहोत.आपणासाठी 4 जी बी रँम असलेला संगणक पुरेसा आहे.



3) हार्ड डिस्कः- आपण आपला डाटा ज्या वर साठवत असतो ती क्षमता लक्षात घेऊन डार्ड डिस्क किती असावी हे आपण ठरवावे. 500 जी.बी. साठवण क्षमता असलेला संगणक आपल्यासाठी पुरेसा ठरतो. जर साठवण क्षमता 1 टी.बी.करावयाची असेल तर किंमत वाढेल.



4) प्रोसेसरः- प्रोसेसर म्हणजे साध्या भाषेत सागांचे झाले तर संगणकाचा वेग किंवा संगणकाची कार्य करण्याचा वेग आपणासाठी ड्यूल कोअर किवा आय 3 प्रोसेसर पुरेसा ठरतो. पुढील वर्जन आहेत माञ किंमत जास्त आहे. आय 7 पर्यंत उपल्बध आहेत.आपणासाठी आय 3.



5) ग्राफिक कार्डः- आपण एच डी व्हीडीओ पाहाणार असाल तर एच डी ग्राफिक्स घ्यावेत.



6) किंबोर्डः- आपण संगणकाचा वापर कोठे करणार आहात त्यावरुन आपणास युएसबी अथवा वायरलेस किंबोर्ड ते निवडावे.वायरलेस किंबोर्ड व युएसबी किबोर्ड यात जास्त फरक नाही.



7) माँनिटरः- आपल्या कामाचे स्वरुप पाहता 19.5 इंच चा माँनिटर आपणासाठी योग्य आहे माञ त्यामध्ये एच डी रिव्हूलोशन असावे जेणेकरुन त्यावर एच डी व्हिडीओ दिसू शकतील.त्याला एच डी एम आय सुविधा असावी.व विजेची बचत करणारा इनरजी सेव्हिंग असावा.



8) युपीएसः- वरिल संगणकाकरिता यूपीएस अतिशय महत्वाचा घटक आहे. साधारणपणे 600 व्होल्टचा यूपीएस असावा.

वरिल प्रमाणे वैशिष्ट्य असलेला संगणक अथवा लँपटाँप आपण विकत घेउ शकता.

Comments

Popular posts from this blog

कोडींग शिकण्यासाठी संगणकाचे बेसिक ज्ञान आवश्यक आहे का?

संगणक शाखेचा विद्यार्थ्यांनी Software Development कडे फोकस करावे की Web Development कडे ?

कोडींगचा पाया पक्का करण्यासाठी सी प्रोग्रामिंग शिकले तर चालते का?