Computer Hardware & Repairing क्षेत्राची ओळख : कॉम्प्युटर हार्डवेअर आणि कॉम्प्युटर दुरुस्ती - एक संपूर्ण माहिती
Blog – 16 “ Computer Hardware & Repairing क्षेत्राची ओळख : कॉम्प्युटर हार्डवेअर आणि कॉम्प्युटर दुरुस्ती - एक संपूर्ण माहिती” कॉम्प्युटर हार्डवेअर आणि रीपेअरिंग क्षेत्राची ओळख व करिअर संधी १. कॉम्प्युटर हार्डवेअर म्हणजे काय ? कॉम्प्युटर हार्डवेअर म्हणजे बाह्य भाग – कॉम्प्युटरच्या ज्या भागांना आपण हाताने स्पर्श करू शकतो व डोळ्यांनी बघू शकतो. प्रामुख्याने यात खालील घटक ( Physical Components) समाविष्ट असतातः मदरबोर्ड ( Motherboard) प्रोसेसर ( CPU - Central Processing Unit) रॅम ( RAM - Random Access Memory) हार्ड ड्राइव्ह ( HDD/SSD - Hard Disk Drive/Solid State Drive) पॉवर सप्लाय ( Power Supply Unit - PSU) ग्राफ़िक्स कार्ड ( Graphics Card - GPU) कीबोर्ड , माउस , मॉनिटर आणि इतर इनपुट-आउटपुट डिव्हाइसेस २. कॉम्प्युटर रीपेअरिंग म्हणजे काय ? कॉम्प्युटर रीपेअरिंग म्हणजे संगणकाच्या हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर समस्या ओळखून त्यांचे निदान व दुरुस्ती करणे. यामध्ये खालील सेवा असतातः हार्डवेअर रिप्लेसमेंट आणि मेंटेनन्स सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन आणि...